टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Jay Pawar: “पाडू नको बरं!” कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर जय पवार बसले ‘गुलाबी’ दुचाकीवर; बारामतीत मिश्कील टिप्पणीने पिकला हशा

Follow Us:

Jay Pawar: एका कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर ते त्याच्या दुचाकीवर बसले आणि यावेळी त्यांनी केलेल्या मिश्कील टिप्पणीमुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार (Jay Pawar) सध्या गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. खांडज येथे दौऱ्यावर असताना जय पवार  (Jay Pawar) यांचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. एका कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर ते त्याच्या दुचाकीवर बसले आणि यावेळी त्यांनी केलेल्या मिश्कील टिप्पणीमुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. (Jay Pawar)

Jay Pawar: अजितदादांसाठी खास ‘गुलाबी’ दुचाकी

जय पवार खांडज परिसरात लोकांशी संवाद साधत असताना एका कार्यकर्त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यकर्त्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दलच्या प्रेमापोटी आपली दुचाकी खास ‘गुलाबी’ रंगात रंगवून घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसची सध्याची ‘गुलाबी’ थीम आणि अजितदादांवरील निष्ठा यातून त्याने ही दुचाकी तयार केली होती.

Jay Pawar: जयदादांनी राखला कार्यकर्त्याचा मान

आपल्या लाडक्या नेत्याचा मुलगा गावात आल्याचे पाहून या कार्यकर्त्याने जय पवार यांना आपल्या या खास दुचाकीवर बसण्याचा आग्रह केला. जय पवार यांनीही कार्यकर्त्याचा उत्साह पाहून क्षणाचाही विलंब न लावता आनंदाने होकार दिला.

Jay Pawar: “पाडू नको बरं!”

जय पवार जेव्हा दुचाकीवर बसले, तेव्हा त्यांनी त्या कार्यकर्त्याला हसत हसत “पाडू नको बरं!” अशी मिश्कील कोपरखळी लगावली. जयदादांच्या या गावरान अंदाजातल्या टिप्पणीमुळे तिथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये एकच हशा पिकला. जय पवार यांचा हा दिलखुलास अंदाज सध्या बारामतीत चर्चेचा विषय ठरत आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now