टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

ब्रेकिंग! ऐन दिवाळीत गुजरातमध्ये जातीय दंगल

On: October 25, 2022 10:46 AM
Follow Us:

गुजरातमधील वडोदरा या ठिकाणी दिवाळीच्या रात्री जातीय हिंसाचार झाला आहे. पानीगेट भागात काल मध्यरात्री २ गटांत झडप झाली. त्यानंतर तुफान दगडफेक झाली. दंगेखोरांनी स्ट्रीट लाइट बंद करून दगडफेक केली आणि अनेक वाहनांची जाळपोळ केली. पोलिसांवरही पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आले. सुदैवाने पोलीस यामधून सुखरूप बाहेर पडण्यात यशस्वी झाले.
या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता आज 19 जणांना अटक करण्यात आली आहे. या भागातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने वाहनांची जाळपोळ करणाऱ्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वांची कसून चौकशी केली जात आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. डीसीपी म्हणाले की, सीसीटीव्ही तपासले जात आहेत आणि प्रत्यक्षदर्शींचीही चौकशी केली जात आहे.

काल रात्री दिवाळीची पूजा झाल्यानंतर पानीगेट मुस्लीम मेडिकल कॉलेजजवळ फटाके फोडले. यावरून वाद सुरू झाला. त्यानंतर एका पक्षाने स्ट्रीट लाइट बंद करून दगडफेक सुरू केली. तसेच समाजकंटकांनी रस्त्या शेजारी उभी असणारी वाहने आणि सामानांची जाळपोळ केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now