टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

…तर दररोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होतात

Follow Us:

राष्ट्रवादीचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आज विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक बनले आहेत. या घटनेवरून जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आव्हाड यांच्यावर करण्यात आलेली कारवाई चुकीची आहे. तक्रार करणाऱ्या महिलेचा विशिष्ट हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गर्दीत अंगावर येणाऱ्या व्यक्तीला हा प्रकार विनयभंग होऊ शकत नाही. जर हा गुन्हा होत असेल तर गर्दीत रोज बाजारात, ट्रेनमध्ये व अन्य ठिकाणी शेकडयांनी विनयभंग होत असतील, असेही त्यांनी नमूद  केले. 
दरम्यान आव्हाड यांच्यावर आज विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलेच पेटले आहे. केवळ 72 तासात दोन गुन्हे दाखल झाल्याने आव्हाड संतापले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या आमदारकीच्या राजीनाम्याची तयारी केली आहे, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंब्रा येथे ही घटना घडली आहे. याबाबतची तक्रार भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने नोंदवली आहे. आव्हाड यांनी आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, असा आरोप संबंधित महिलेने केला आहे.
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 80 लाख महिला अपात्र; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

ऑल पिक्चर क्लिअर… कोण लढतंय कुणाविरोधात? यादी आली समोर; महायुती विरुद्ध महाविकास आघाडी थेट सामना

Mahayuti Candidate List : महायुतीचं टेन्शन वाढलं, तब्बल 8 जागांवर बंडखोरीचा धोका; कुठं कुठं कोणाचा अर्ज?

Shivsena Candidate List : एकनाथ शिंदेंची पुन्हा स्मार्ट खेळी, शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर

काँग्रेस आणि पवार गटाचे उमेदवारही ठरले, कुणाला लागली लॉटरी; टफ फाईट होणार; सोलापूर – आदित्य फत्तेपूरकर यांना उमेदवारी जाहीर

Vidhan Parishad Election 2026: सातारा-सांगलीत शरद पवार गटाची ‘डबल’ खेळी! विधान परिषद निवडणुकीसाठी दोन उमेदवार अर्ज भरणार; नेमकं कारण काय?