एका बाईसाठी नेहरुंनी देशाची फाळणी केली

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. यावरून भाजप, मनसे आणि शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली.
अनेक ठिकाणी आंदोलने, मोर्चे निघाले. राहुल यांनी केलेल्या विधानाचे खंडन करत वीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नेहरु यांनी एका बाईसाठी भारताची फाळणी केल्याचा गंभीर आरोप रणजीत यांनी केला आहे. नेहरूंनी 12 वर्षे भारताची गुप्त माहिती इंग्रजांना दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
इतकेच नाही तर त्यांनी राहुल यांना या आरोपांचे उत्तर देण्याचा आवाहन केले आहे. रणजीत पत्रकारांशी बोलत होते. नेहरूंनी एका बाईसाठी भारताची फाळणी मान्य केली होती. ते 12 वर्षे भारताची गुप्त माहिती इंग्रजांना देत होते. पंडित नेहरू आमि एडविवा यांच्यातील पत्रव्यवहार ब्रिटीशांकडून मागवून तो जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, ज्या नेत्याला आपण चाचा नेहरू म्हणतो त्यांनी देशाचा विश्वासघात कसा केला हे संपूर्ण देशाला कळेल. नेहरू 9 मे ते 12 मे 1947 या काळात एकटेच शिमल्याला गेले होते. चार दिवस ते कुटुंबासह तेथेच राहिले.
एडविना यांनी ब्रिटीश सरकारला लिहिलेल्या पत्रात पंडित नेहरूंना माझे पाहुणे म्हणून निमंत्रित केल्याचा उल्लेख आहे. तसेच ते खूप व्यस्त असल्याने नर्व्हस ब्रेक डाउन जवळ येत आहे. त्यांनी माझ्यासोबच चार दिवस घालवले आणि ते माझे चांगले मित्र झाले आहे, आमची मैत्री दीर्घकाळ टिकेल. यावेळी नेहरू माझ्या ताब्यात आल्याचे एडविना यांनी म्हटल्याचा दावा रणजीत यांनी केला आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon