होंडाने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक फक्त ३,९९९ रुपयांचे डाउन पेमेंट भरून होंडा अॅक्टिवा टू-व्हीलर फायनान्सचा लाभ घेऊ शकतात. ग्राहक ५००० रुपयांचा कॅशबॅक आणि ७.९९ टक्के व्याजदर देखील घेऊ शकतात. ही ऑफर कंपनीच्या निवडक मॉडेल्स आणि ग्राहकांसाठी दिली जात आहे. ही ऑफर ८ जानेवारीपर्यंत वैध आहे.
तुम्ही चांगली परफॉर्मन्स बाईक घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी होडा शाईन हा चांगला पर्याय असू शकतो. यामध्ये, कंपनीने सिंगल सिलेंडर १२४ सीसी एअर-कूल्ड फ्युएल इंजेक्टेड इंजिन वापरले आहे, जे १०.७ पीएस पॉवर आणि ११ एनएम टॉर्क जनरेट करते.