Sunday, October 6, 2024
Homepoliticalसोलापूर लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादी लढविणार?

सोलापूर लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादी लढविणार?

भाजपने आपल्या मोठ्या मिशनवर संपूर्ण ताकद लावून तयारी सुरू केली असताना महाराष्ट्रात राष्ट्रवादीने मात्र काँग्रेसच्या हक्काच्या जागा आपल्याकडे खेचून घेण्याची तयारी चालवली आहे. सोलापूर मतदारसंघ परंपरागत दृष्ट्या युतीत भाजपकडे आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीत काँग्रेसकडे असतो. 

मात्र, सोलापूरमध्ये राष्ट्रवादीचा खासदार व्हावा, अशी इच्छा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. सोलापूरमध्ये आमदार आणि खासदार बदलावेत, असे सूचक वक्तव्य करून त्यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनाच डिवचले आहे.
कारण सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसमध्ये शिंदे यांचे वर्चस्व आहे. शिंदे हे शरद पवारांचे घट्ट मित्र पण राजकीय विरोधक आहेत.
या पार्श्वभूमीवर सोलापूरची काँग्रेसची हक्काची जागा खेचून घेण्याची राष्ट्रवादीने तयारी केली आहे. रोहित पवारांचे वक्तव्य त्या दृष्टीने सूचक आहे. किंबहुना संपूर्ण महाविकास आघाडीतच नव्हे, तर काँग्रेस – राष्ट्रवादी या मूळ आघाडीत देखील त्यामुळे दरार उत्पन्न करण्याची ही चिन्हे आहेत.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments