सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांची गुरुवारी बदली झाली. त्यांची वस्त्रोद्योग नागपूर येथे बदली झाली आहे. सोलापूर आयुक्तपदी शितल तेली-उगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उगले यांना पदस्थपना देण्यात आली नाही. शिवशंकर यांना तातडीने पदभार सोडून वस्त्रोद्योग उपसंचालक नागपूर इथला पदभार घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. राज्याचे मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी आज हे आदेश काढले.
शिवशंकर हे 30 एप्रिल 2020 रोजी महापालिका आयुक्त म्हणून सोलापुरात आले कोरोनाच्या दोन्ही लाटेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आयुक्त शिवशंकर यांनी काम केले आहे. प्रशासक म्हणून ही मागील सहा महिन्यांपासून त्यांनी अनेक सुविधा महापालिकेत केल्या, कामचुकार कर्मचाऱ्यांवर त्यांनी जबर बसवला होता. तसेच त्यांची कारकीर्द वादग्रस्तही ठरली होती.