Saturday, September 21, 2024
Homesolapurसोलापूर ब्रेकिंग! जुना बोरामणी नाका व गुरुनानक चौक रस्त्याचे भाग्य उजळले

सोलापूर ब्रेकिंग! जुना बोरामणी नाका व गुरुनानक चौक रस्त्याचे भाग्य उजळले

जुना बोरामणी नाका ते अशोक चौक ते गुरुनानक चौक हा  रस्ता पूर्णपणे खराब व खड्डेच खड्डे असून या रस्त्यावर अनेक जणांची बळी गेला व अनेक जणांना अपंगत्व झाले याची दखल घेऊन निरंजन बोद्धूल यांच्या पुढाकाराने अनेक वेळा निवेदन व सह्याचीं मोहिम राबविण्यात आली. याची दखल घेऊन मनपाच्यावतीने 40 लाख रुपये मंजूर करण्यात आले.
अशोक चौक येथील रस्ता करण्यात आला. परंतू जुना बोरामणी नाका व गुरुनानक चौक येथील बरेच दिवसापासून कामास सुरुवात करण्यात आली नाही. हा रस्त्याचे काम काम त्वरीत व चांगल्या प्रकारे काम करण्यात यावी यासाठी मनपाचे सहाय्यक अभियंता, भूमी मालमत्ता शांताराम आवताडे, इंजिनिअर बिराजदार व प्रचंडे यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. लवकरच जुना बोरामणी नाका व गुरुनानक चौक कुर्बान हुसेन झोपडपट्टी येथील रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments