Saturday, September 21, 2024
Homemaharashtraसीमाभागातील ४० गावे कर्नाटकच्या वाटेवर, महाराष्ट्र सरकार काय करतंय? मुख्यमंत्री शिंदे अ‍ॅक्शन...

सीमाभागातील ४० गावे कर्नाटकच्या वाटेवर, महाराष्ट्र सरकार काय करतंय? मुख्यमंत्री शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये

सांगली जिल्ह्यातील कायम दुष्काळाने पीडित जत तालुक्यातील ४० गावे कर्नाटकमध्ये सामील होणार असल्याचा व या गावांच्या विलिनीकरणाऱ्या प्रस्तावावर आम्ही गांभीर्याने विचार करत असल्याचे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केल्याने राज्यातील राजकारण पेटले असून राज्यातील सीमाभागातील गावांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राष्ट्रवादी-शिवसेनेच्या नेत्यांनी यावरून शिंदे सरकारवर सडकून टीका केली आहे.
अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शिंदेंनी म्हटले आहे की, ही मागणी २०१२ ची आहे. साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर शिर्डी येथे ते माध्यमांशी बोलत होते.
शिंदे म्हणाले, या गावांची ही मागणी २०१२ ची आहे. त्यावेळी या दुष्काळी भागात पाण्याची टंचाई होती. त्यानंतर तेथे बऱ्याच योजना केल्या आहेत. जलउपसा सिंचन, जलसिंचन प्रकल्प अशा अनेक गोष्टी मार्गी लावल्या जात आहेत. त्यामुळे पाण्यामुळे एकही गाव कर्नाटकमध्ये जाण्याचा विचार करणार नाही.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments