वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्यावतीने आज सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या समर्थनार्थ बैठक पार पडली. या बैठकीत विमानसेवा सुरू व्हावी यापेक्षा चिमणी पाडण्यात जास्त रस असणाऱ्या व कटकारस्थान करून पद्द्यामाघून खेळी करणाऱ्या, लोकांना येणाऱ्या काळात त्यांची जागा दाखवावी, अशी मागणी उपस्थित मान्यवरांनी केली.
याप्रसंगी प्रास्ताविक करताना माजी नगरसेवक जगदीश अण्णा पाटील म्हणाले की, विमानसेवा सुरू झाली पाहिजे, ही सगळ्यांची इच्छा आहे, मात्र 30 ते 40 हजार लोकांच्या पोटावर पाय देऊन जर कोणी, कटकारस्थान करून कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर, आम्ही हे कदापि सहन करणार नाही. काडादी कुटुंबियांचे सोलापूरच्या जडणघडणीत मोठे योगदान असून, त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न,व्यक्ती द्वेषापोटी केलं जात असून,यांचा बोलवता धनी कोण आहे, हे आता सर्वांना कळलं आहे.
बाळासाहेब भोगडे यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील स्वतः सोलापूर दौऱ्यावर आले असता म्हणाले होते की, बोरामणी विमानतळाचा विकास आम्ही करू व वन विभागाला पर्यायी जागा देऊ. असे असताना हे आंदोलन करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे.
भाजयुमोचे अक्षय अंजिखाने यांनी मनोगत व्यक्त करत असताना सांगितले की, 4 ऑक्टोंबर रोजी झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले होते की, चिमणी न पाडता होटगी रोड विमानसेवा सुरू करु, मात्र तेथील विमानसेवा ही तात्पुरती सोय असून, बोरामनी विमानतळ विकास करून विमानसेवा सुरू करणे भविष्यातील अडचणी लक्षात घेता,गरजेचे असल्याचे सांगितले होते. मात्र काही लोकांना विमानसेवा सुरू नको,चिमणी कशी पडेल यात जास्त उत्सुकता असून,यांचा बोलवता धनी कोण आहे, हे ओळखणे जास्त गरजेचे आहे.
भाजयुमोचे सागर अतनुरे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ज्या साखर कारखान्यामुळे आज हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो, तो बंद पाडण्यासाठी जर कोणी कटकारस्थान करत असेल तर,याकरिता आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहे.
गुड्डापूर धानम्मा मंदिर ट्रस्ट अध्यक्ष सिद्धय्या स्वामी यांनी सुद्धा धर्मराज काडादी साहेबांचे समर्थन करताना म्हणाले की, काडादी कुटुंबीयांनी सोलापूरच्या विकासात मोलाचे योगदान दिले असुन, त्यांना आज त्रास देण्याचे प्रयत्न जे लोक करत आहेत. ते व्यक्तीद्वेषाने प्रेरित असूनयामागे बोलवता धनी कोण आहे,शोधलं पाहिजे.
नगरसेवक सुभाष शेजवाळ यांनी आपलं मनोगतात सांगितलं की, माझ्या प्रभागातील 3 ते साडेतीन हजार कर्मचारी त्या ठिकाणी कार्यरत असून,कारखाना बंद पडला तर,त्यांचं उदरनिर्वाह कसा चालणार ? याच उत्तर कोणाकडे आहे व या कष्टकरी लोकांसाठी मी लढत राहणार असल्याचे सांगत धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला.
माजी सभागृह नेते सुरेश अण्णा पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना,धर्मराज काडादी म्हणजे देवमाणूस असून,या माणसाच्या विरोधात कटकारस्थान करणाऱ्यांना सिद्धरामेश्वर माफ करणार नसल्याचे,आपल्या मनोगतात सांगितले व आपण फक्त भाषण देऊन स्वस्थ न बसता आणखीन तीव्र आंदोलन या साखर कारखाना वाचण्यासाठी केलं पाहिजे असे आक्रमक प्रतिक्रिया त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे समारोपीय भाषण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती महादेव चाकोते यांनी केले. ते म्हणाले की,आतापर्यंत समाज म्हणून आपण ज्या लोकांना मोठं केलं, आज तेच लोक समाजाची संस्था बंद पाडायला निघाले असून काडादी अप्पा,चाकोते अप्पा व शिवदारे अण्णा या सर्वांनी मिळून त्यावेळी हा कारखाना सर्व समाजाला सोबत घेऊन स्थापन केला व या कारखान्यात सर्वात जास्त भाव शेतकऱ्यांना दिला जात असूनसुद्धा आज षडयंत्र रचून व्यक्तिद्वेषाने प्रेरित लोक हे कारस्थान करत आहेत,त्यांना जनता माफ करणार नाही, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापूरे, सिद्धराम चाकोते, केदार उंबरजे, चंद्रकांत रमणशेट्टी, प्रकाश हत्ती, देवस्थान कमिटीचे दर्गोपाटील, अमर बिराजदार, रेवनसिद्ध आवजे, गजानन धरणे, सुनील शरणार्थी, बाळासाहेब देशमुख, सचिन शिवशक्ती, गुरुनाथ निंबाळे, गौरव जक्कापुरे, अशोक नागणसुरे, नागा पाटील, स्वामी, बेंबलगी, महेश जेऊर, गुरुराज पदमगोंडा, अप्पू यलशेट्टी, शिवानंद सावळगी, सतीश पारेली, चडचनकर, सागर बिराजदार, गंगाधर झुरळे, विनोद गडगे, शिलवन्त छपेकर, आकाश हरकुड व प्रतिष्ठानचे संचालक, विविध समाजातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ निंबाळे यांनी केले व आभार गौरव जक्कापुरे यांनी मानले.