Sunday, October 6, 2024
Homemaharashtraसाहेब मला माफ करा...

साहेब मला माफ करा…

साहेब मला माफ करा… मी क्षमस्व आहे… अशा स्वरुपाचा बॅनर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाजवळ लावण्यात आला आहे. बॅनरच्या माध्यमातून राजेश चिंदरकर नावाच्या शिवसैनिकाने मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या बॅनरची चर्चा आहे. साहेब, मी आपल्या आशीर्वादाने राजकारणामध्ये आलो आणि आपल्या आठवणीचा अमृत साठा घेऊन एक शिवसैनिक म्हणून माझी राजकीय वाटचाल चालू ठेवली आहे.

आपल्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण रेखाटलेल्या व्यंगचित्रांचे शिलालेख, तसेच आपल्याला आवडणाऱ्या चाफ्यांच्या फुलांचे उद्यान निर्माण करण्यासाठी मी २०१३ पासून मुंबई महापालिकेकडे पत्रव्यवहार करत होतो. शेवटी २०१९मध्ये माझ्या प्रयत्नांना यश मिळाले आणि मला उद्यानाची परवानगी मिळाली.
परंतु जेव्हा हे काम साकारण्याचा माझ्या संस्थेने प्रयत्न केला, तेव्हा मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कदाचित माझे हे काम आवडले नसावे. त्यांनी काम सुरू होण्यापूर्वीच माझ्याकडे टक्केवारीची मागणी केली. मात्र हे काम अधिकृत असल्यामुळे त्यांना मी टक्केवारी देऊ शकलो नाही. त्यामुळे त्यांनी हे काम सुरू होण्याआधीच थांबवले, अशा स्वरुपाचे आरोप बॅनरद्वारे करण्यात आले आहेत.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments