- शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या वारकरी संप्रदायाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह भाषणाच्या व्हिडीओ क्लीप व्हायरल झाल्या आहेत. अंधारे यांनी या व्हिडीओत संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यांवरून वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. त्यांनी अंधारेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
भागवत संप्रदायातील संत परंपरेला वाटत असेल, मी चुकत आहे. पण मी एकाही पक्षाची, राजकीय नेत्याची माफी मागितली नाही, कारण ती माझी स्टाईल आहे. तरीसुद्धा कळत नकळत माझ्या बोलण्याने वारकरी संत सांप्रदायाच्या भावना दुखावल्या असतील, तर क्षमा मागण्यासाठी काही गैर वाटणार नाही, असं अंधारेंनी म्हटलंय.
माझ्या पक्षाने जर मला सांगितलं की सुषमाताई, तुमच्यामुळे थोडा त्रास होतोय, तर तेवढं म्हणण्याचीही वेळ मी येऊ देणार नाही. कारण पक्ष माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. माझ्या पक्षसाठी किंवा उद्धव ठाकरेंसाठी काम करायचं असेल, तर ते मी कुठेही राहून करू शकते, असं अंधारे म्हणाल्या.
शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे राजीनामा देणार?
RELATED ARTICLES