वनप्लस पुढच्या वर्षी आपले OnePlus 11 हे मॉडेल लाँच करू शकते. या स्मार्टफोनच्या लाँचपूर्वी त्याच्या फीचर्स, कॅमेरा आणि इत्यादी गोष्टीबद्दल चर्चा सुरू आहे. हा मोबाईल क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 चिपसेट सपोर्टसह येऊ शकतो.
वनप्लसने आपला वनप्लस 10 Pro हा स्मार्टफोन एमराल्ड फॉरेस्ट आणि व्होल्कॅनिक ब्लॅक या दोन नवीन रंगांमध्ये लाँच केला आहे. तर कंपनी नवीन स्मार्टफोन दोन नवीन कलर व्हेरिएंटमध्ये सादर करू शकतो. हा स्मार्टफोन मॅट ब्लॅक आणि ग्लोसी ग्रीन या कलरमध्ये बाजारात लाँच करू शकते. वनप्लस11 मध्ये देखील Oppo Find N2 सारखेच कॅमेरा स्पेसिफिकेशन देण्यात येणार आहे. वनप्लस 11 आणि Oppo Find N2 कॅमेरा सोडल्यास यांच्या इतर हार्डवेअर स्पेसिफिकेशन वेगळी असण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारामध्ये या मोबाईलची किंमत 43,490 रुपये असू शकते.