राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकदा एकेरी उल्लेख केला आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी याबाबतचा एक व्हिडीओ सादर केला.
याबाबत शिवसेना खासदार संजय राऊतांनी संताप व्यक्त केला. हा संताप व्यक्त करताना त्यांच्या तोंडून शिवराळ भाषा निघाली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. राऊत म्हणाले की, सरकारमध्ये खुर्च्यांना फेविकॉल लावून बसले आहेत.
ते सर्व विषयावर बोलतात पण महाराजांच्या अपमानावर बोलत नाहीत. मला वाटलं होतं एखादा केंद्रीय मंत्री, मायका लाल स्वाभिमानाने उभा राहील आणि राजीनामा देऊन महाराष्ट्रात परतेल. शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानासाठी त्याग केला म्हणून सांगेल. पण सर्व XXX औलाद आहे, असा हल्ला त्यांनी केला.