माजी मंत्री, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. आज सकाळी ईडीचे 20 अधिकारी मुश्रीफांच्या कोल्हापूरातील कागलमधील घरी पोहचले. कोल्हापूर आणि पुणे या दोन ठिकाणी ईडीने ही छापेमारी केली आहे. अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा केल्याच्या आरोपाखाली मुश्रीफ यांच्या घरावर ही छापेमारी करण्यात आली आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांकडून मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. त्यांच्या घराभोवती सुरक्षा जवानांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ईडीच नाही तर आयकर विभागानेही तपासणी सुरु केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफांविरोधात कारवाईची मागणी केली होती. 2019 मध्येही मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर, साखर कारखान्यावर ईडीने छापेमारी केली होती. त्याचवेळी पुण्यातील घराचीही ईडीने झडती घेतली होती. सोबत मुश्रीफ यांचा मुलगा साजिद यांच्या कोंढव्यातील घरावर आयकर विभागाने धाड टाकली होती.
मोठी बातमी! हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचा छापा
RELATED ARTICLES