माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवरील बेहिशेबी मालमत्ता आरोप प्रकरणी सुनावणी घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाकडून निश्चित झाले आहे. गौरी भिडे यांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती. ही सुनावणी न्यायमूर्ती धीरज ठाकूर आणि न्यायमूर्ती वाल्मिकी मेनेझेस यांच्या खंडपीठासमोर होणार आहे.
उद्धव आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप भिडे यांनी केला आहे. त्याच सोबत उद्धव आणि कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेची सीबीआय आणि ईडीकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.