आज अखेर उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेच्या प्रभागांच्या संख्येवरून निर्माण झालेल्या वादावर निर्णय दिला. शिंदे सरकारच्या निर्णयावर हायकोर्टाने शिक्कामोर्तब केले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुनील शुकरे, न्या. एम. डब्ल्यू. चंदवाणी यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. याचिकेत काही तथ्य नसल्याची टिप्पणीही खंडपीठाने केली. यामुळे ठाकरे गटाला धक्का मिळाला असून मुंबई महापालिकेतील प्रभाग संख्या २२७ राहणार असणार आहे.
महाविकास आघाडी सरकारने मुंबई महापालिकेतील २२७ वॉर्ड संख्या वाढवून २३६ करण्यात आली होती. हा नियम फक्त मुंबई महापालिकेसाठीच होता. कारण या महापालिकेसाठी वेगळा कायदा आहे. यानंतर शिंदे सरकारने ही रचना बदलून पूर्वीचीच २२७ वॉर्ड संख्या कायम ठेवली होती.
या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे राजू पेडणेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. बीएमसी प्रभाग संख्या आणि पुनर्रचनेसंदर्भातील सुनावणी १८ जानेवारीला पूर्ण झाली होती. मुंबई हायकोर्टाने हा निर्णय राखून ठेवला होता.