पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील निगडे धांगवडी येथे गुंजवणी नीरा नदीपात्रातील पाण्यात मोटार ढकलत असताना गेलेली वीज परत आल्याने आणि पाण्यात वीज प्रवाह उतरल्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला.
यामध्ये बाप लेकांचा समावेश आहे. विठ्ठल सुदाम मालुसरे (वय ४५), सनी विठ्ठल मालुसरे (वय २६), आनंदा ज्ञानेश्वर जाधव (वय ५५), अमोल चंद्रकांत मालुसरे (वय ३६, सर्व रा निगडे ता. भोर) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. हे चौघे नदीपात्रातील पाण्यात मोटार ढकलत असताना अचानक लाइट आल्याने त्यांना विजेचा धक्का लागून त्यांच्या जागीच मृत्यू झाला.