मुख्यमंत्रिपदासाठी लफंगेगिरी कोणी केली? हे जनतेने बघितले; शिंदेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter
महाविकास आघाडीच्या मुंबईतील महामोर्चावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. तीनही पक्षांनी एवढी मेहनत घेतली, किती बैठका घेतल्या, किती तयारी केली, आणि मोर्चा आपण पाहिलेला आहे की त्याला किती यश मिळाले. ते मला सांगण्याची गरज नाही.
त्यांच्या मोर्च्यापेक्षा आमच्या रत्नागिरीतील सभेला जस्त्र गर्दी होती. त्यांना खोटे वाटत असेल तर आमच्या सभेची माहिती घ्यावी, असा चिमटा शिंदे यांनी काढला. तसेच राज्य सरकारचे काम पाहून विरोधकांची पायाखालची जमीन सरकली आहे, असे प्रत्युत्तर शिंदे यांनी दिले.
सत्ता आणि मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी लफंगेगिरी कोणी केली? लफंगे कोण आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेने बघितले आहे. बाळासाहेबांचे विचार कुणी तोडून मोडून टाकले? ज्या पक्षाबरोबर निवडणूक लढवली त्याच्या पाठित खंजीर कसा खुपसला, ही लफंगेगिरीच आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon