फुटबॉल विश्वकप स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यात व्यस्त असलेल्या कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. चर्चगेट येथे गरवारे क्लबमध्ये फिफा विश्वचषक फायनल मॅच पाहत असतांना त्यांचा ३ वर्षांचा मुलगा क्लबमधलील रेलिंगच्या दरीतून घसरून पाचव्या मजल्यावरून खाली पडला. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
हृदयांशू अवनीश राठोड (वय ३, रा, परळ) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमूकल्याचे नाव आहे.
त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राठोड कुटुंबीय हे गरवारे क्लबमध्ये फुटबॉलकहा अंतिम सामना पाहण्यासाठी गेले होते.
यावेळी ते क्लबच्या टेरेसवर सहाव्या मजल्यावर होते. सामना पाहण्यात गुंग असतांना त्यांचा मुलगा हृदयांशू हा खाली आला. पाचव्या मजल्यावर असतांना जिन्याच्या काचेच्या स्लॅब रेलिंग जवळ आला. या ठिकाणी रेलिंग तुटले असल्याने हा मुलगा त्यातून खाली पडला. यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.