Saturday, September 21, 2024
Homeindia worldमहिलांनी काही घातले नाही तरी त्या छान दिसतात

महिलांनी काही घातले नाही तरी त्या छान दिसतात

महिला साडी आणि सलवार सूटमध्ये छान दिसतात. काही घातले नाही तरी छान दिसतात, असे वादग्रस्त वक्तव्य योगगुरू रामदेव बाबा यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित असलेल्या कार्यक्रमात रामदेव बाबांनी हे वक्तव्य केले आहे.
अमृता फडणवीस १०० वर्षे तरुण राहतील, असेही ते म्हणाले. ठाण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. अमृता यांना तरुण राहण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे. त्या शंभर वर्षांपर्यंत म्हाताऱ्या होणार नाहीत, त्या नेहमीच तोलून मापून खातात. खुश राहतात.
जेव्हा पाहावं तेव्हा लहान मुलांप्रमाणे हसत असतात, असे रामदेव बाबा म्हणाले. साडीमध्ये महिल्या चांगल्या दिसतात. सलवार सूटमध्येही चांगल्या दिसतात. माझ्या नजरेने पाहिले तर काही नाही घातले तरी चांगल्या दिसतात, असे वक्तव्य रामदेव बाबांनी केले आहे. यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments