शिंदे गटाचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. राऊत यांची अवस्था सध्या पिंजरे में पोपट बोले. या हिंदी गाण्यासारखी झाली आहे. 40 आमदारांच्या नावाने खडे फोडतात.
कुडमुड्या ज्योतिष्यासमोर कार्ड ठेवलेले असतात, असं ते म्हणाले. राऊतही रोज सकाळी उठतात. 40 कार्डपैकी काही कार्ड उचलतात आणि बोलायला सुरुवात करतात, अशी टीका त्यांनी केली आहे. अनेक नेत्यांनी पक्ष बदलले तसेच बंद केले याचेही दाखले म्हस्के यांनी दिले आहेत. ते म्हणाले, मुळात गद्दार कोणाला म्हणतात काँग्रेसमधून शरद पवार बाजूला झाले, असंही ते म्हणाले.
ज्यांनी शिवसेना सोडली त्यांच्याही कपाळावर गद्दार लिहिलेला आहे, तुम्हाला दिसला असेल ते त्यांच्या बाजूला मग कसे बसतात?, असंही म्हस्के म्हणाले. ते काँग्रेसचे खासदार होते. काही लोक काही लोक घेऊन बाजूला झाले. मग पवार साहेबांच्या पण कपाळावर गद्दर लिहिलय का?, असा प्रश्न देखील राऊत यांना विचारला आहे.