Sunday, October 6, 2024
Homepoliticalमंत्री व्हायचंय का? सभागृहात ठाकरेंच्या आमदाराला फडणवीसांनी दिली ऑफर

मंत्री व्हायचंय का? सभागृहात ठाकरेंच्या आमदाराला फडणवीसांनी दिली ऑफर

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत विविध मुद्द्यांवरून शिंदे सरकारला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी राज्यमंत्र्यांच्या बंगल्यांच्या रंगरंगोटीवरुन सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.

यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं.
प्रभू यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. विद्यमान स्थितीत राज्य सरकारमध्ये एकही राज्यमंत्री नसताना नागपूर अधिवेशनात राज्यमंत्र्यांचे सगळे बंगले सजवले गेलेले आहे. ज्या बंगल्याची आत्ता आवश्यकता नाही, असे प्रभू म्हणाले.
प्रत्येक अधिवेशनात अशी रंगरंगोटी होत असते आणि त्याचा खर्च लाखो-करोडो वगैरे नसतो. पाहिजे तर आपल्याला खर्चाचा हिशेब पाठवतो, असे फडणवीस म्हणाले. प्रभू यांनी बंगल्यांच्या रंगरंगोटीवरुन सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. पण फडणवीसांच्या बिनतोड युक्तिवादापुढे त्यांचा मुद्दा तोकडा पडला. दुसरीकडे तुम्हाला मंत्री व्हायचंय का? अशी विचारणा केला. फडणवीसांनी प्रभूंना दिलेल्या खुल्या ऑफरनंतर सभागृहात खसखस पिकली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments