Sunday, September 8, 2024
Homepoliticalभाजपमध्ये राजकीय भूकंप

भाजपमध्ये राजकीय भूकंप

देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात चांगलेच तापू लागले आहे. राजकीय पक्षांकडून प्रचार केला जात आहे. विविध ठिकाणी जाहीर सभा होत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये अजूनही महायुतीला उमेदवार निश्चित करता आलेला नाही. महाविकास आघाडीने येथे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना तिकीट दिले आहे. तसेच अंबादास दानवे यांची नाराजीही घालवली. दुसरीकडे मात्र महायुतीत अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

या मतदारसंघासाठी पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे नाव फायनल होत असतानाच महायुतीत राजकीय भूकंप झाला आहे. भाजपच्या दहा माजी नगरसेवकांनी उमेदवार अपक्ष विनोद पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. छत्रपती संभाजीनगरची जागा शिंदे गटाला मिळणार आहे. या मतदारसंघात भुमरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

भुमरे पैठणचे आमदार आहेत. या भागातील जबरदस्त राजकीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. परंतु, येथे त्यांना मोठा विरोधही आहे. आता हाच विरोध निवडणुकांच्या तोंडावर समोर आला आहे. या मतदारसंघात तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. खैरे हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. तर एमआयएमने विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनाच पुन्हा संधी दिली आहे.

भुमरेंच्या संभाव्य उमेदवारीविरोधात स्थानिक भाजप नेत्यांनी आवाज उठवला आहे. दहा नगरसेवकांनी अपक्ष उमेदवार पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच भाजप शहराध्यक्ष बोराळकरांना पत्र पाठवत भुमरे उमेदवार नको, असा संदेश दिला आहे. भाजपचे माजी उपमहापौरांसह अन्य नेत्यांचा यात समावेश आहे. 

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments