देशभरात मोठ्या अपघातांचे सत्र सुरूच असून क्रिकेटपटू ऋषभ पंत याला झालेल्या अपघाताची देशभर चर्चा सुरू असताना गुजरातमध्ये एक दुर्घटना घडली आहे.
गुजरातच्या नवसारी येथे काल रात्री कार व बसच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील वेस्मा गावाजवळ हा अपघात झाला.
अपघातग्रस्त बस अहमदाबादेतील एका कार्यक्रमानंतर मुंबईच्या दिशेने येत होती.
तेवढ्यात रस्त्याच्या पलीकडून उलटलेली कार दुभाजक ओलांडून बसच्या समोर आली आणि बसला धडकली. यात कारमधील सर्व ८ जण जागीच ठार झाले, तर बस चालकाने अचानक ब्रेक लावल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला. कारमधील सर्व लोक भरूचमधील एका फार्मा कंपनीचे कर्मचारी आहेत.
संबंधित बातम्या

Solapur Politics: सोलापूरमध्ये राजकीय भूकंप, फडणवीसांच्या बंगल्यावर रात्री 11.30 वाजताच्या गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

Kantara Chapter 1 : ‘कांतारा : चाप्टर 1’ने अवघ्या 7 दिवसांत पहिल्या भागाचं लाइफटाइम कलेक्शन केलं पार

मोठी बातमी ! पुण्यातील कोंढव्यात दहशतवादी? ATS सह यंत्रणा रात्रीपासून तळ ठोकून, सर्च ऑपरेशन अजूनही सुरूच,अपडेट काय

लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी

राज आणि उद्धव पुन्हा आले एकत्र, यावेळेस काय ठरलं निमित्त? जाणून वाटेल आश्चर्य!