Saturday, September 21, 2024
Homesolapurब्रेकिंग! सोलापूर बंद ; जाणून घ्या ताजी अपडेट

ब्रेकिंग! सोलापूर बंद ; जाणून घ्या ताजी अपडेट

छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप नेत्यांनी वादग्रस्त विधान केल्याने आज सोलापूर बंद आहे. या बंदला नागरिकांनी प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद असून एरवी गजबजलेला परिसर असलेल्या बाजारात शुकशुकाट पाहायला मिळाला.
श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने सोलापूर बंदची हाक दिली आहे.
दुपारी २ पर्यन्त हा बंद पाळला जाणार आहे. सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळपासून सोलापुरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. या बंदला महाविकास आघाडी व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. भाजप आणि मनसेने या बंदला विरोध केला आहे. आज काही ठिकाणी सर्व व्यवहार सुरळीत सुरु होते. काही ठिकाणी बंदचा परिणाम जाणवला नाही. 
बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. ९ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, २७ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १५४ पोलीस अंमलदार, ४ राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, ९ जलद प्रतिसाद टीम बंदोबस्तामध्ये सहभागी आहेत.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments