Sunday, October 6, 2024
Homesolapurब्रेकिंग! सोलापूर उद्या दुपारी वाजेपर्यंतच बंद : मात्र शाळा, रिक्षा सुरु राहणार...

ब्रेकिंग! सोलापूर उद्या दुपारी वाजेपर्यंतच बंद : मात्र शाळा, रिक्षा सुरु राहणार का ?

गेल्या काही महिन्यापासुन श्री छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व इतर महापुरुषांबाबत केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी मंत्री आणि त्यांचे नेतेमंडळी यांच्याकड़ून सातत्याने होत असलेल्या अपमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ शुक्रवार १६ डिसेंबर रोजी श्री. शिवजयंती मध्यवर्ती महामंडळ व सर्व राष्ट्रप्रेमी व महापुरुष प्रेमी संघटना, कामगार संघटना, राजकीय पक्ष अशा सर्वानी एकत्रितपणे सकाळ पासुन दुपारी २ वाजेपर्यंत बंद पुकारला आहे. या बंदला सोलापूर शहर काँग्रेस पक्षाचा जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. तसेच व्यापारी यांनी देखील पाठींबा दिला आहे.

दरम्यान या बंदला भाजप, शिंदे गट, मनसेने विरोध केला आहे. शाळा सुरु राहतील, अशी शक्यता आहे. तसेच रिक्षा चालक संघटनेची भूमिका अजून स्पष्ट झाली नाही. या बंदच्या अनुषंगाने शहरात मोठा बंदोबस्त राहणार आहे.         

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments