Sunday, September 8, 2024
Homemaharashtraब्रेकिंग! सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी

ब्रेकिंग! सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी

ठाकरे गटाची संपत्ती शिवसेनेला देण्याबाबतची याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. वकिल आशिष गिरी यांनी ही याचिका दाखल केली होती. त्यांची संपत्तीवर दावा करणारी ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. गिरी यांचा शिवसेना ( शिंदे गट) यांच्याशी काहीही संबंध नाही, असे म्हणत न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.  
निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह यावर निर्णय दिल्यानंतर, हे स्पष्ट झाले होते की, अधिकृत शिवसेना ही शिंदे गटाची आहे. त्याचाच आधार घेत गिरी या वकिलांनी ठाकरे गटाची मालमत्ता शिवसेनेला मिळावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. शिवसेनेची ( ठाकरे गट) जी काही मालमत्ता आहे. शिवसेना भवन, स्थावर आणि जंगम मालमत्ता शिवसेनेला( शिंदे गट) मिळावी, अशी याचिका गिरी यांनी दाखल केली होती. यावर शिवसेनेने (शिंदे गट) आपला गिरी यांच्याशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले होते.
सुप्रीम कोर्ट म्हणाले की, आधीच याबाबत आधीच एक याचिका दाखल असताना नवी याचिका दाखल करणारे तुम्ही कोण? असे विचारत न्यायालयाने गिरी यांची याचिका फेटाळून लावली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments