पत्रा चाळ प्रकरणात तुरुंगावासानंतर जामिनावर सुटका झालेले शिवसेना खासदार संजय राऊत पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या मुद्द्यावर केलेल्या एका भाषणाप्रकरणी बेळगाव न्यायालयाने त्यांना समन्स बजावले आहे.
न्यायालयात हजर न राहिल्यास त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. बेळगावात ३० मार्च २०१८ रोजी केलेल्या एका भाषणाच्या संदर्भात बेळगाव न्यायालयाने राऊत यांना समन्स बजावले आहे. बेळगावात ३० मार्च २०१८ रोजी केलेल्या एका भाषणाच्या संदर्भात बेळगाव न्यायालयानं राऊत यांना समन्स बजावले आहे. तसेच त्यांना एक डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हजर न राहिल्यास अटक वॉरंट बजावले जाणार आहे.