Saturday, September 21, 2024
Homesolapurब्रेकिंग! शेळगी अपघातातील मृतांची संख्या वाढली

ब्रेकिंग! शेळगी अपघातातील मृतांची संख्या वाढली

सोलापूर शहरातील शेळगी परिसरातील महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस रोडवर आलेल्या मालट्रकने समोरून रेणार्‍या रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षातील एक युवती गंभीर जखमी होऊन मरण पावली तर इतर सात जण जखमी झाले.
हा अपघात  शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास झाला. मिसबा शुकूर मुलाणी (वय- १४), असे मरण पावलेल्या युवतीचे नाव आहे. मुजीर पठाण (वय- २४), रुकसाना (वय- ५०), जन्नत, हसीना (वय- ०७), गुड्डो मन (वय- ०५), नौशाद (वय- ३२, सर्व रा. सोलापूर) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या अपघातात मिजबा शुकूर मुलाणी या चौदा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे तर इतर आठ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (शासकीय रूग्णालयात) उपचार सुरू आहेत. कोरबू कुटुंबीय हे मित्र नगरहून शहाजहुरअली दर्गा येथे जात होते. त्यावेळी परमशेट्टी मिल चौक परिसरात समोरून येणाऱ्या ट्रकने जोरात धडक दिली.
या धडकेत रिक्षा पलटी होऊन दुसऱ्या बाजूला गेली. यात रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला. यात जखमी झालेल्यांना नागरिकांनी दुचाकी व दुसऱ्या रिक्षाने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान आज सकाळी यातील जखमी  मोहम्मद साद (वय- ०७ ) याचाही  बळी गेला. हा चिमूरडा शेळगी येथील राजवर्धन शाळेत दुसरीत शिकत होता.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments