महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चर्चेत आला आहे. यावर आता महाराष्ट्रातील शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सीमाभागातील 865 गावांना मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील एकही गाव बाहेर जाणार नाही, असे म्हटले होते.
सीमाभागातील बेळगावसह 865 गावांतील संस्था आणि संघटनांना आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. 865 गावांमधील सामाजिक, शैक्षणिक, धर्मादाय, सांस्कृतिक, निम सार्वजनिक संस्था आणि संघटनांना मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री धर्मादाय निधीसाठी पुढील वर्षासाठी म्हणजे 2023-24 सालासाठी 10 कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे. दरम्यान, सांगलीच्या जत तालुक्यातील 40 गावांनी केलेला ठराव फार जुना असल्याचा निर्वाळा फडणवीस यांनी दिला आहे.