देशातील नागरिकांसाठी एक खुशखबर आहे. कारण 80 कोटी लोकांना पुढील एक वर्ष मोफत रेशन देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. काल मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पत्रकारांना दिली. मोदी सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत देशातील 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचा निर्णय घेतला आहे.
देशातील गरिबांना रेशनसाठी एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. मार्च 2020 मध्ये कोरोनाचे संकट आले. तेव्हापासून देशात ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेला अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता पुन्हा तोच निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत बीपीएल कार्डधारकांना दर महिन्याला प्रति व्यक्ती चार किलो गहू आणि एक किलो तांदूळ मोफत दिला जातो. या योजनेला नव्याने मुदतवाढ दिल्यामुळे केंद्र सरकारवर दोन लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याची माहितीही गोयल यांनी दिली.