कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाने राज्यातील वातावरण चांगलेच पेटले आहे. प्रत्यारोपाचा खेळ रंगला आहे. कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. सोलापुरात ही याचे पडसाद उमटले आहेत.
सोलापुरात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे. दरम्यान कर्नाटकच्या एसटीवर जय महाराष्ट्र लिहून काळे फासल्याची घटना आज घडली आहे. दरम्यान हा प्रकार घडल्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या गाड्या बंद करण्यात आल्या. आज सकाळपासून दोन्ही राज्यातील बससेवा अगदी सुरळीतपणे सुरू होत्या.
मात्र दुपारी कोल्हापुरात कर्नाटक एसटी महामंडळाच्या गाडीवर जय महाराष्ट्र लिहून काळे फासल्याची घटना घडली. घटनेचे गांभीर्य ओळखून दोन्ही राज्यातील बसेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. बस सेवा अचानक बंद झाल्यामुळे विद्यार्थी, शेतमजूर आणि व्यापाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.