आज सकाळी देशातील पेट्रोल व डिझेलचे दर अपडेट झाले आहेत. महाराष्ट्र व मेघालय वगळता पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात, बिहार, मध्य प्रदेश, यूपी यासह सर्व राज्यांमध्ये सलग 179 दिवशी इंधनाचे दर स्थिर आहेत.
गेल्या सात महिन्यांपासून तेल कंपन्यांनी इंधनाच्या
दरात वाढ केलेली नाही. दिल्लीत 96 रुपये, मुंबईत एकशे सहा रुपये तर सोलापुरात 112 रुपये प्रति लिटर असा पेट्रोलचा दर आहे. आता तुम्ही घरबसल्या एसएमएस द्वारे पेट्रोल व डिझेलचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर एसएमएस सेंड केल्यास तुम्हाला इंधनाचे दर कळू शकतील.