पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले. मध्यरात्री ३.३० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मोदी यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली.
त्यांच्या पश्चात पंतप्रधान मोदी, सोमभाई, अमरुतभाई, प्रल्हादभाई, पंकजभाई ही मुलं आणि मुलगी वासंतीबेन यांच्यासह सुना, नातवंडे, पतरुंड असा परिवार आहे. आईची तब्येत बिघडल्याचे कळताच मोदी गुजरातमध्ये दाखल झाले होते.
तासभर आईच्या प्रकृती चौकशी त्यांनी केली. वृद्धापकाळ आणि आजारपणामुळे त्यांची प्रकृती बिघडली. मात्र, उपाचाराला साथ न मिळाल्याने त्यांचे निधन झाले.
यंदाच्या १८ जून रोजी हिराबेन मोदी यांनी वयाची १०० गाठली होती. त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला होता. वाढदिवसासाठी पंतप्रधान मोदी स्वतः गांधीनगरला गेले होते. आईचे पाय धुवून त्यांनी आशीर्वादही घेतले होते. पंतप्रधान मोदी यांना आई हिराबेनबदद्ल विशेष स्नेह होता. हिराबेन गांधीनगरमध्ये मोदींच्या भावाबरोबर राहत होत्या.