देशातील संविधान वाचवायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येसाठी तयार रहायला हवं, असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री राजा पटेरिया यांनी केलं आहे. मध्यप्रदेश सरकारनं पटेरियावर गुन्हा दाखल केला असून प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जारी केले आहेत.
मध्यप्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील पवईमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पटेरिया म्हणाले की, देशाच्या संविधानाला आणि आदिवासींच्या हक्कांसाठी लढायचं असेल तर त्यांना मोदी यांची हत्या करण्यासाठी तयार रहावं लागणार आहे. सध्या देशात राजकीय सौहार्दाचं वातावरण नाहीसं होत असून जातीधर्मांमध्ये फूट पाडली जात आहे. त्यामुळं राजकारणात सकारात्मक बदल होईल, असं वाटत नाही. राजकारणात आरोप-प्रत्यारोप करताना नेत्यांच्या भाषेचा स्तर खालावत असून त्यामुळं हे बदलायचं असेल तर मोदींच्या हत्येसाठी तयार रहावं लागणार असल्याचं वक्तव्य पटेरिया यांनी केलं आहे.