Sunday, September 8, 2024
Homemaharashtraदेशाच्या सर्वात प्रभावशाली नेत्याचा असा आहे राजकीय प्रवास

देशाच्या सर्वात प्रभावशाली नेत्याचा असा आहे राजकीय प्रवास

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव राज्यासोबत देशाच्या राजकारणामध्ये प्रमुख नेत्यांमध्ये घेतले जाते. पवार हे 82 वर्षांचे झाले आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यातील 55 वर्षे राजकारणाला दिली आहेत. त्यांचा राजकीय कारकिर्दीतील अनुभवाला खूप महत्व आहे. या वयातही तरुणांनाही लाजवेल, असा उत्साह पवारांमध्ये आहे.
बारामती तालुक्यातल्या काटेवाडी या गावामध्ये 12 डिसेंबर 1940 रोजी जन्मलेल्या पवारांनी वयाच्या 27 व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला. वडील गोविंदराव आणि आई शारदाबाई यांच्या पोटी जन्मलेल्या पवार यांना राजकारण आणि समाजकारणाचे बाळकडू आई शारदाबाई यांच्याकडून मिळाले. 1967 मध्ये बारामती मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना पवार यांचे राजकीय गुरू मानले जाते. पवार यांनी काँग्रेस पक्षातून राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते आणि 1999 मध्ये स्थापनेपासून ते त्याचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे महत्वाचे योगदान आहे.
पवार यांनी आतापर्यंत चार वेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली आहे. राष्ट्रीय पातळीवरही त्यांनी अनेक मोठ्या जबाबादाऱ्या संभाळल्या आहेत. पवारांनी देशाचे संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री म्हणून काम पाहिले. पवार हे अनेक वर्षांपासून खासदार आणि विधानसभेचे सदस्य आहेत. 

पवारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. महाविकास आघाडी सरकारला कोविड महामारीच्या काळामध्ये राज्याचे नेतृत्व करण्यासाठी पवारांचा अनुभव आणि सल्ले मोलाचे ठरले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments