काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्या बद्दल वक्तव्य करून वाद निर्माण केला आहे. भारत जोडो पदयात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. या पदयात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी सावरकर यांच्या बद्दल वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून दिली आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेले वक्तव्य चुकिचे आहे.
शिवसेना राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी सहमत नाही, असे स्पष्ट मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. भारत जोडो यात्रेत वीर सावरकर यांचा विषय काढण्याची गरजच नव्हती, असेही राऊत म्हणाले. राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे.
सावरकरांचा अपमान शिवसेना कधीच सहन करणार नाही. अशा वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते , ते महत्त्वाचे विधान राऊत यांनी काढले. इतिहासात घडलेल्या गोष्टी बाहेर न करता भविष्यकाळात इतिहास कसा निर्माण करता येईल याकडे राहुल गांधी यांनी लक्ष द्यावे, असा सल्ला राऊत यांनी दिला.