टीईटी घोटाळाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. राज्यात गाजलेल्या या प्रकरणात आता शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. तसे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात टीईटी परीक्षा घेण्यासाठी अपात्र कंपन्यांना पात्र केले गेले. हा प्रकार झाला नसता तर संबंधित घोटाळा घडलाच नसता, असे मत फडवणीस यांनी मांडले. त्यामुळेच आता माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.
हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिसांनी मंत्रालयातील शिक्षण विभागाचे सहसचिव सुशील खोडवेकर यांना अटकही केली होती. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी वंदना कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची घोषणा वर्षा गायकवाड यांनी केली होती.
मात्र ही चौकशी रखडली. मात्र आता राज्यातील शिंदे सरकारकडून वर्षा गायकवाड यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेत गैरव्यवहार झाला. सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता.