Sunday, September 8, 2024
Homesolapurजुळ्या बहिणींशी लग्न करुनही 'अतुल' कायद्याच्या कचाट्यातून सुटला

जुळ्या बहिणींशी लग्न करुनही ‘अतुल’ कायद्याच्या कचाट्यातून सुटला

  • रक्ताच्या नात्यातील व्यक्तीने तक्रार केली नसल्याने पोलिसांना तपास करता येणार नाही, असे निर्देश न्यायालयाने दिल्यामुळे जुळ्या बहिणींशी विवाह केलेल्या तरूणाला दिलासा मिळाला. अतुल आवताडे याने जुळ्या बहिणींशी विवाह केला. 
    अकलूज येथे झालेल्या या विवाहाची चर्चा झाली. हिंदू कायद्यानुसार एका वेळी दोघींशी विवाह करता येत नसल्याने अकलूज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता.  तपासाकरता पोलीसांनी माळशिरस न्यायालयाकडे परवानगी मागितली होती, मात्र रक्ताच्या नात्यातील व्यक्तीने तक्रार केली नसल्याने तपास करता येणार नाही, असे निर्देश न्यायालयाने दिल्यामुळे रिंकी आणि पिंकी या जुळ्या बहिणींशी विवाह केलेल्या अतुल याला दिलासा मिळाला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments