Sunday, September 8, 2024
Homemaharashtraखुशखबर! राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री देणार

खुशखबर! राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री देणार

पक्षात फूट पडून दोन गट निर्माण झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेनेतून फुटून गेलेल्या शिंदे गटावर उद्धव आक्रमकपणे टीका करत असतात. मुंबईत काल लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२८ व्या जयंतीचा कार्यक्रम होता. 

यावेळी उद्धव यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात भाषण करताना उद्धव यांनी महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री विराजमान करण्याचे मोठे संकेत दिले. यासोबतच त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय रणसंग्रामासाठी रणशिंग फुंकले. ठाकरेंनी राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री देणार असल्याचे विधान केल्याने, आता चर्चा सुरू झाली आहे.
ठाकरेंच्या मनातील महिला मुख्यमंत्री कोण? ती  शिवसेनेचीच असेल का? की बाहेरच्या पक्षाच्या चेहऱ्याला संधी दिली जाईल? सध्या या चर्चेला उधाण आले आहे. शिवसेनेतल्या नीलम गोऱ्हे, किशोरी पेडणेकर, मनीषा कायंदे, प्रियंका चतुर्वेदी अशा महिला नेत्यांनी शिवसेनेच्या भूमिका परखडपणे मांडल्या आहेत. त्यात रश्मी ठाकरेंचेही नाव नेहमीच चर्चेत असते. नव्याने आलेल्या सुषमा अंधारेही शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून ओळख निर्माण करत आहेत.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments