Sunday, September 8, 2024
Homemaharashtraखुशखबर! राज्यात गुलाबी थंडीची चाहूल, जाणवतोय गारवा

खुशखबर! राज्यात गुलाबी थंडीची चाहूल, जाणवतोय गारवा

ऐन दिवाळीत राज्यातील वातावरण बदलले असून गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. सोलापुरातील तापमानातही घट होताना दिसत आहे. देशातून नैऋत्य मोसमी वारे परतल्यामुळे राज्यात थंडी वाढली आहे. याशिवाय कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारवा वाढत आहे.

राज्यातील पुढील आठवडाभर कोरड्या हवामानाची शक्यता आहे. त्यामुळे रात्रीचे किमान पातमान कमी राहाणार असल्याची शक्यता आहे. सध्या राज्यात कमाल व किमान तापमानात घट झाली आहे. यंदा परतीच्या पावसाने राज्यातील जनतेला व शेतकर्‍यांना दणका दिला. या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

संपूर्ण देशातूनच पावसाने माघार घेतल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. यंदा थंडी कडाक्याची राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हळूहळू थंडीचे प्रमाण वाढत असून पहाटे व सकाळी व्यायाम करणार्‍या नागरिकांची गर्दी चौका-चौकात, मैदानात दिसून येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments