Sunday, October 6, 2024
Homeindia worldकाँग्रेसला धक्क्यांवर धक्के.. बालेकिल्ले गमावले

काँग्रेसला धक्क्यांवर धक्के.. बालेकिल्ले गमावले

पोटनिवडणुकीत 6 राज्यांतील 7 जागांसाठी निकाल जाहीर झाले आहेत. हे निकाल काँग्रेस आणि पक्षाचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासाठी धक्कादायक आहेत. पोटनिवडणुकीत भाजपच्या खात्यात 4, तेलंगणा राष्ट्र समितीला 1, शिवसेनेला 1, राष्ट्रीय जनता दलाच्या खात्यात 1 जागा आल्या आहेत. विजयी उमेदवारांच्या यादीत काँग्रेसचे नाव कुठेही नाही. पक्षाने तीन जागांवर उमेदवार उभे केले होते.
काँग्रेसने हरियाणातील आदमपूर, ओडिशातील धामनगर आणि तेलंगणातील मुनुगोडे गमावले. विशेष म्हणजे आदमपूर आणि मुनुगोडेला काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणतात. दोन्ही जागा काँग्रेसच्या ताब्यात होत्या, पण पक्षाच्या आमदारांनी भाजपकडे वळल्यानंतर समीकरणे बदलली आणि परिणाम असा झाला की काँग्रेसने एकाच वेळी दोन गड गमावले. 

एकीकडे आदमपूर भाजपकडे आले. त्याचवेळी टीआरएसने मुनुगोडे ताब्यात घेतले. भाजप आमदार विष्णू चरण सेठी यांच्या निधनामुळे धामनगर ही जागा रिक्त झाली आहे. येथे त्यांचे पुत्र सूर्यवंशी सूरज यांनी भाजपकडून तिकिट मिळवत विजयाचा झेंडा फडकावला.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments