Saturday, September 21, 2024
Homemaharashtraएकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद धोक्यात

एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद धोक्यात

मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारणाला वेगळंच वळण लागलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आले असून त्यांची जागा आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याचे वक्तव्य बावनकुळे यांनी केलं आहे. श्री संत जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा आणि श्री संताजी आर्ट गॅलरीचे भूमिपूजन फडणवीस आणि बावनकुळे यांच्या हस्ते नंदनवनमधील जगनाडे चौकात पार पडले. यावेळी बावनकुळे यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाबद्दल इच्छा बोलून दाखवली.
फडणवीस यांनी सर्वच समाजाला न्याय देण्याचं काम केलं. महाराष्ट्राचं सर्वोच मुख्यमंत्रिपद मिळालं पाहिजे, अशी जबाबदारी आपल्यावर आहे, पुढील काळात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर जर आपल्याला फडणवीस यांना बसलेलं पाहायचं असेल, तर आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची वेळ आहे, असं बावनकुळे म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments