काही महिन्यापूर्वी भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ अमरावती येथील अमोल कोल्हे यांनी पोस्ट शेअर केली होती. याचा राग मनात धरून उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली.
इतकेच नव्हे तर हे प्रकरण मिटविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणला का, याची चौकशी करणार असल्याची माहिती गृह विभागाचे प्रभारीमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. ही चौकशी गुप्तचर विभागाच्या आयुक्तांमार्फत करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
उमेश कोल्हे यांची काही धर्मांध मुस्लिम तरुणांनी हत्या केली असाही आरोप होत आहे. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांनी फोन करून पोलीस यंत्रणेवर दबाव टाकला, असा आरोप अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला.
रवी राणा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना देसाई यांनी ही माहिती दिली. या प्रकरणाची पंधरा दिवसात चौकशी करून अहवाल सादर होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.