टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा सेमी फायनलमध्ये पराभव झाला. त्यानंतर टीम इंडियावर टीका झाली. त्यामुळे संघात काही बदल करण्यात आले. आता आणखी काही बदल होणार आहेत. टीम मॅनेजमेंट, खेळाडू आणि स्टाफमध्ये कही मोठे बदल होणार आहे. सर्वात आधी बीसीसीआयने निवड समितीची हकालपट्टी केली. त्यानंतर नवीन निवड समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. आता टीम मॅनेजमेंटमध्ये बदल करण्याची तयारी सुरू आहे.
आता टी-20 फॉरमॅटसाठी बीसीसीआय वेगळा प्रशिक्षक नेमण्याच्या पर्यायावर विचार करत आहे. संघाचे व्यस्त वेळापत्रक ही केवळ खेळाडूंसाठीच नाही तर सपोर्टिंग स्टाफसाठीही मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे आता राहुल द्रविडचे लक्ष केवळ एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांकडे वळवले जाऊ शकते. तसेच, जानेवारीपर्यंत टीम इंडियाला नवा कर्णधार आणि नवीन टी-२० सेटअप मिळू शकतो. नवीन निवड समितीची लवकरच घोषणा केली जाऊ शकते, असेही अधिकाऱ्याने सांगितले.