रेल्वेमध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी मोठी संधी! RRB ने टेक्निशियन पदांसाठी 6000 हून अधिक जागांची भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. अर्ज 30 जून 2026 पासून सुरू होऊन 29 जुलै 2026 पर्यंत करता येईल. वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क आणि निवड प्रक्रियेची सविस्तर माहिती नोटिफिकेशनमध्ये उपलब्ध आहे. इच्छुकांनी त्वरित अर्ज करावा.

मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये ग्रेड-1 साठी 352 तर ग्रेड-2 साठी 6242 पदांची भरती होणार आहे. पुढील महिन्यात म्हणजेच 30 जून 2026 पासून या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून 29 जुलै 2026 ही अंतिम मुदत असेल. म्हणजेच इच्छकांना अर्जासाठी तब्बल 1 महीना मुदत मिळमार आहे.
या भरतीमध्ये ग्रेड-1 आणि ग्रेड-2 या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ग्रेड 1 पदांसाठी 18 ते 33 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. त्यांच्याकडे फिजिक्स , कॉम्प्युटर किंवा आयटीमध्ये पदव्युत्तर (ग्रॅज्युएशन) पदवी असणे आवश्यक आहे. तर ग्रेड 2 पदांसाठी 18 ते 30 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.
झोनवाईज रिक्त पदांची संख्या
सेंट्रल रेल्वे, मुंबई – 870
साउदर्न रेल्वे, चेन्नई – 785
नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे, गुवाहाटी – 701
साउथ ईस्टर्न रेल्वे, कोलकाता – 576
नॉर्दर्न रेल्वे, नवी दिल्ली – 548
वेस्टर्न रेल्वे, मुंबई – 544
साउथ सेंट्रल रेल्वे, सिकंदराबाद – 368
ईस्टर्न रेल्वे, कोलकाता – 291
नॉर्थ सेंट्रल रेल्वे – 268
साउथ वेस्टर्न रेल्वे, हुबळी – 240
वेस्ट सेंट्रल रेल्वे, जबलपूर – 231
नॉर्थ वेस्टर्न रेल्वे, जयपूर – 199
ईस्ट सेंट्रल रेल्वे, हाजीपूर – 186
नॉर्थ ईस्टर्न रेल्वे, गोरखपूर – 169
साउथ ईस्ट रेल्वे, बिलासपूर – 90
प्रोडक्शन युनिट (BLW/CLW/ICF) – 499
अर्ज शुल्क किती ?
रेल्वे टेक्निशियन पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य प्रवर्ग, EWS आणि OBC उमेदवारांसाठी शुल्क 500 रुपये असेल. तर SC/ST उमेदवारांसाठी शुल्क – 250 रुपये आणि सर्व महिला उमेदवारांसाठी शुल्क – 250 रुपये इतकी फी असेल.
अर्जामध्ये काही चूक झाल्यास दुरुस्तीसाठी 250 रुपयांचे अतिरिक्तशुल्क आकारले जाईल. हे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे.
या रेल्वे पदाच्या भरतीसंदर्भात, अर्ज केल्यानंतर यशस्वी उमेदवारांची सीबीटी (CBT) चाचणी घेतली जाईल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी घेऊन प्रक्रिया पूर्ण केली जाईल. शेवटी, अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
कशी असेल सिलेक्शन प्रोसेस ?
रेल्वे पदाच्या भरतीसंदर्भात सांगायचं झालं तर अर्ज केल्यानंतर यशस्वी उमेदवारांची सीबीटी (CBT) चाचणी घेतली जाईल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी घेऊन प्रक्रिया पूर्ण केली जाईल. शेवटी, अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List) तयार केली जाईल.
हे सुद्धा वाचा















