राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर शिंदे गटाने पुन्हा गुवाहाटीचा दौरा केला आहे. त्यावरून विरोधक त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी ठाकरे गटावर निशाणा साधत आज आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे हिंदुत्व पुढे घेऊन जात राज्यात भाजपसोबत सरकार स्थापन केले.
आता ठाकरे गटाला समजले असेल बळी नक्की कोणाचा गेला आहे आणि वैचारिक मृ्त्यू कोणाचा झाला आहे हेही समजलं असेल, असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लगावला आहे. अकरा शक्तीपिठामधील एक असणारे हे कामाख्या देवीच्या दर्शनाला आम्ही आलो असल्याचेही कदम यांनी सांगितले.