अंगप्रदर्शन अंगलट येणार? उर्फी जावेदवर होणार कारवाई

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

भररस्त्यात अंगप्रदर्शन करणे अभिनेत्री ऊर्फी जावेदला महागात पडणार आहे. कारण भाजप महिला मोर्च्याच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी थेट पोलीस आयुक्तांची भेट घेऊन उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे उर्फीच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

वाघ यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे उर्फीची तक्रार केल्याचे ट्विटद्वारे सांगितले आहे. मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स आणि किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फीवर कायदेशीर कारवाई करावी, यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था यांची भेट घेत मागणी केली आहे, असे म्हणत त्यांनी तक्रार केल्याचे पत्र ट्विट केले आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon