अबॅकस राष्ट्रीय स्पर्धेत विश्व ब्रेन डेव्हलपमेंट अबॅकस क्लासेस, सांगोलाच अव्वल यश

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सांगोला: सोलापूर येथील निर्मल कुमार फडकुले सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या प्रो क्टिव्ह अबॅकस नॅशनल समर कॉम्पिटिशन 2025 मध्ये सांगोला येथील विश्व ब्रेन डेव्हलपमेंट अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य सिद्ध करत घवघवीत यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी केवळ 6 मिनिटांमध्ये 100 गणिते सोडवून आपली गुणवत्ता दाखवली.

जिथे जिद्द, मेहनत, योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळते, तिथे यश अटळ असते हे या क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. विविध गटांमध्ये एकूण 25 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. सलग आठव्या वर्षीही 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखत, 2025 मध्येही सलग दुसर्‍या वर्षी या संस्थेला 10,000 रुपयांचा चेक आणि ’बेस्ट सेंटर अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी:- प्रथम क्रमांक- अद्विक किरण जगताप – 99/100, द्वितीय क्रमांक- गुरुराज नामदेव मेहत्रे – 91/100, तृतीय क्रमांक- आयुष अरुण कोळेकर, श्रेया खंडू जगताप – 94/100

चतुर्थ क्रमांक मिळवणारे विद्यार्थी: उत्कर्षा अमोल नवले – 81/100, विघ्नेश पोपट काशीद – 92/100, विश्वेश्वरय्या सचिन वाले – 82/100, श्रेयश दत्तात्रय शिंदे – 96/100,विवान अमरदीप लेंडवे – 97/100, परिणीती विशाल नलवडे – 88/100, श्रेया दत्तात्रय शिंदे – 86/100

बेस्ट परफॉर्मन्स विजेते:- विश्वेश बाबर, गीतांजली बनकर, युगंधर भाकरे, स्वरा साळुंखे, भक्ती कलढोणे, अर्णव कवडे, प्रिया अवताडे, श्रेयश पवार, नक्ष कांबळे, अनुष्का बनकर, सोहम पवार, आयुष जगताप, सार्थक साळुंखे, उर्वशी कलढोणे.

या विद्यार्थ्यांनी दाखवलेली गती, अचूकता आणि आत्मविश्वास हे त्यांच्या सातत्यपूर्ण सरावाचे फलित आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संचालिका मोरे मॅडम आणि सहशिक्षिका प्रिया मॅडम यांनी अभिनंदन केले.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon